रस्त्यांची लागली वाट

By Admin | Updated: July 16, 2014 00:44 IST2014-07-15T23:23:44+5:302014-07-16T00:44:14+5:30

अहमदनगर :रिलायन्स केबल टाकणे, फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी नगर शहरातील रस्त्यांची खोदाई सुरू आहे. खोदाईनंतर रस्ते लगेचच पॅचअप केले जात नाहीत.

The roads started to fall | रस्त्यांची लागली वाट

रस्त्यांची लागली वाट

अहमदनगर :रिलायन्स केबल टाकणे, फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी नगर शहरातील रस्त्यांची खोदाई सुरू आहे. खोदाईनंतर रस्ते लगेचच पॅचअप केले जात नाहीत. कोठी, बालिकाश्रम, केडगाव देवी, मुकुंदनगर भागातील रस्त्यांची कामे सुरू असली तरी त्या कामांना वेग नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाने पाणी खड्ड्यात साठून रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसाच्या पाण्याने खड्डेही चालकांना कळून येत नाही. खडड्यांमुळे वाहनाचे नुकसान होतेच पण त्याचसोबत माणसांची हाडेही खिळखिळी होत आहे. ज्या यंत्रणेने रस्ते दुरूस्ती करावयाची त्या महापालिकेलाही रस्ते चकचकीत करण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. वाहनचालकांना शहरात वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. सत्ताधारी मग ते आताचे असो की यापूर्वीचे नगरकरांना विकासाचे नुसतेच आश्वासने देत आली आहेत. प्रत्यक्षात विकास कुठेच दिसत नाही.
फेज टू योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. खोदाईनंतर दुरूस्ती महापालिकेला करावयाची आहे. महापालिका मात्र हे काम अजूनही हाती घेत नाही. रिलायन्स कंपनीने महापालिकेला पाच कोटी रुपये दिले खरे पण ते काम करण्यास ठेकेदारही उत्सुक नाहीत.

Web Title: The roads started to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.