सांडवा फाटा ते मांडव्यापर्यंतच्या रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:52+5:302020-12-17T04:45:52+5:30

अहमदनगर : नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या सांडवा फाटा ते मांडव्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी रस्ता ...

The road from Sandwa Fata to Mandwa has become a death trap | सांडवा फाटा ते मांडव्यापर्यंतच्या रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

सांडवा फाटा ते मांडव्यापर्यंतच्या रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

अहमदनगर : नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या सांडवा फाटा ते मांडव्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, युवक अध्यक्ष बापू खांदवे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, मनोहर खांदवे आदी उपस्थित होते.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्डे चुकविताना वाहनांचे लहान-मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या भागात असलेल्या खडी क्रेशरमुळे अवजड वाहनांची वाहतूक दररोज सुरू असल्यानेदेखील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा येत्या पंधरा दिवसांत संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-------

फोटो - १६जनआधार

सांडवा फाटा ते मांडव्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

Web Title: The road from Sandwa Fata to Mandwa has become a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.