तीस वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:16+5:302021-07-14T04:25:16+5:30

राहुरी : तालुक्यातील चेडगाव परिसरातील गेल्या ३० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडगळीत पडलेला रस्ता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी खुला ...

The road that had been embroiled in controversy for thirty years was opened | तीस वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता झाला खुला

तीस वर्षांपासून वादात अडकलेला रस्ता झाला खुला

राहुरी : तालुक्यातील चेडगाव परिसरातील गेल्या ३० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडगळीत पडलेला रस्ता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी खुला केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आता लोकसहभागातून या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले आहे.

चेडगाव येथील जुना उंबरे ते लोहगाव रस्त्यालगत असणाऱ्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे हा रस्ता वादात सापडल्यामुळे ३० वर्षांपासून अडगळीत पडला होता. रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, काट्यांमुळे हा रस्ता जवळजवळ बंद पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात शेतीमध्ये ये-जा करण्यासाठी तसेच दळणवळणासाठी अत्यंत कसरत करावी लागत होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार शेख यांच्याकडे धाव घेऊन हा रस्ता खुला करावा, अशी मागणी केली होती. तहसीलदारांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून दोन्ही बाजूच्या गटांशी चर्चा केली. तहसीलदारांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी वाद मिटवून घेतला आणि हा रस्ता लगेच खुला करण्याचे आदेश तहसीलदार शेख यांनी दिले. काही वेळातच ३० वर्षांपासून बंद पडलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. यासाठी उपसरपंच विकास तरवडे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव, बापूसाहेब तरवडे, आण्णा घुले, ज्ञानेश्वर घुमे, नवनाथ पुंड, मारूती खेडकर, नवनाथ गिरी, गोरक गिरी, जगन्नाथ तरवडे, नामदेवहरी तरवडे, विष्णू तरवडे, प्रेत्रास खरात यांच्यासह मंडलाधिकारी मेहत्रे, तलाठी डोखे, ग्रामसेवक डुमणे आदींनी परिश्रम घेतले.

...............

गेल्या ३० वर्षांपासून बंद पडलेल्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे ही बाब आम्ही तहसीलदार शेख यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता खुला केला.

- संजय खरात, सरपंच

...............

रस्त्याचे काम करण्यास काही शेतकरी अडथळा निर्माण करत होते. त्यांनी मोजणीही केली होती. पण मोजणी नकाशा समजून न घेता त्याचा ते वेगळा अर्थ काढून रस्ता बंद केला होता. त्यांना समजावून सांगून मोजणी कर्मचारी बोलावून परत हद्दी दाखवल्या. लगेच जेसीबी बोलावून रस्त्याच्या बाजूला असलेले अडथळे, वाढलेल्या फांद्या तत्काळ तोडायला लावल्या. आता रस्ता सुंदर रस्ता झाला असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

120721\img-20210712-wa0070.jpg

??? ?????????? ????? ??????? ????? ???????? ??? ????? ???? ????

Web Title: The road that had been embroiled in controversy for thirty years was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.