क्रिकेट स्पर्धेमुळे नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:41+5:302021-01-08T05:04:41+5:30
कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे बुधवारी (दि.६) शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व मित्र फाउंडेशन आयोजित जय लक्ष्मीआई ...

क्रिकेट स्पर्धेमुळे नवचैतन्य
कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे बुधवारी (दि.६) शहरातील प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व मित्र फाउंडेशन आयोजित जय लक्ष्मीआई चषक या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अमित कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपनरागराध्यक्ष स्वप्नील निखाडे, संचालक बाळासाहेब नरोडे, बाळासाहेब कदम, मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव, बंटी पांडे, गणेश कानडे उपस्थित होते. या स्पर्धेत कोपरगाव तालुक्यासह नाशिक, येवला, राहुरी, संगमनेर, वैजापूर, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी येथील जवळपास ४६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
कोल्हे म्हणाले, कोपरगावात विविध खेळांत नावाजलेली अनेक क्रीडाप्रेमी आहेत. त्यामुळे येथे खेळाची परंपरा आहे.
..............
फोटो०७- क्रिकेट
070121\img-20210106-wa0043.jpg
कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील जय लक्ष्मी आई चषक या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन अमित कोल्हे यांनी केले.