शिक्षकांनी सुरू केलेले कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:48+5:302021-06-05T04:15:48+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वत्र हाहाकार उडवून दिला. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत उच्चांकी भर पडत असल्याने समाजातील अनेक दानूशर ...

Revitalization for Kovid Care Center patients started by teachers | शिक्षकांनी सुरू केलेले कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी

शिक्षकांनी सुरू केलेले कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वत्र हाहाकार उडवून दिला. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत उच्चांकी भर पडत असल्याने समाजातील अनेक दानूशर मदतीसाठी पुढे सरसावले. यात ज्ञानदान करणारे गुरुजी मागे राहिले नाहीत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे व संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांच्या संकल्पनेतून संगमनेरमधील प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने कोविड सेंटर सुरू करण्यास पुढाकार घेतला.

२७ एप्रिलला आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. २४ तास वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी, उच्च गुणवत्तेची औषधे, योगासने, वाचनालय, मनोरंजक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, समुपदेशन, नाष्टा, आयुर्वेदिक काढा व संतुलित जेवण आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. येथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिक्षकांबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनीदेखील मदत केली आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप हे सर्वतोपरी सहाय्य करत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी के.के. पवार, समन्वयक आर.पी. रहाणे दैनंदिन कामकाजाचे संयोजन करत आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधी माधव हासे, गौतम मिसाळ, पोपट काळे, मोहन लांडगे, चंदू कर्पे, शिवाजी आव्हाड, संतोष दळे, गवनाथ बोऱ्हाडे, नंदू रहाणे, राजू कडलग, बाळासाहेब गुंजाळ, सचिन अंकाराम, रवींद्र अनाप, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब भागवत, सोमनाथ गळंगे, सुनील देशमुख, संतोष भोर, सत्यवान गडगे, संदीप पर्बत, अशोक शेटे, अण्णा शिंदे, कैलास वाघमारे, केशव घुगे, निवृत्ती भागवत, प्रकाश शिंदे,विलास दिघे, प्रभाकर काळे, प्रदीप अनाप, अशोक शेटे, दीपाली रेपाळ, अनिता गुंजाळ, वृषाली कडलग, मीना साबळे, भाऊ रंधे, सोमनाथ मदने आदींचे सहकार्य लाभत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, यशोधन कार्यालय प्रमुख इंद्रजित थोरात, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना बालोडे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या स्ट्रॉबेरी स्कूलच्या संचालिका संज्योत वैद्य आदींनी या सेंटरला भेट देत रुग्णांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच शिक्षकांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

___

सेवानिवृत्तीनिमित्त मिष्ठान्न भोजन

सिंधू लॉन्सचे संचालक नरेंद्र राहणे यांनी कोविड केअर सेंटरसाठी लॉन्स मोफत उपलब्ध करून दिला. डॉ. सतीश वर्पे यांनी ३१ हजार रुपये देणगी दिली. शिक्षक कैलास डांगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. बबन फटांगरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त येथील सर्व रुग्णांना एक दिवसाचे मिष्ठान्न भोजन दिले.

Web Title: Revitalization for Kovid Care Center patients started by teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.