शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

अत्यावश्यक जागांवरच नेमणार सेवानिवृत्त शिक्षक

By चंद्रकांत शेळके | Updated: July 17, 2023 21:58 IST

राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदांच्या शाळांतील रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु आता सरसकट रिक्त जागांवर भरती न करता अत्यावश्यक पदांवरच नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे अशी अत्यावश्यक पदे कोणती याची माहिती शिक्षणाधिकारी तालुका स्तरावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून घेणार आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांतीलशिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी शासन आदेश काढण्यात आला आहे. या शिक्षकांची वयोमर्यादा ७० वर्षे राहील, तसेच २० हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून या नियुक्त्या १५ दिवसांत द्यायच्या आहेत, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

याच शासन निर्णयात संबंधित शाळेतील रिक्त शासकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, असे म्हटले आहे. त्याप्रमाणे कोणत्या शाळेवर शिक्षकांची अधिक गरज आहे, याची माहिती घेण्याच्या सूचना आता शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिऱ्यांना दिल्याचे समजते.दरम्यान, या नियुक्तीबाबत ७ जुलै रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. आदेश निघाल्यापासून १५ दिवसांत नियुक्ती प्रक्रिया करावी, असे आदेशात म्हटले आहे. ही मुदत संपण्यास पाचच दिवस राहिले आहेत. परंतु नियुक्ती प्रक्रियेबाबत अजून काहीच कार्यवाही झालेली नसल्याने मुदतीत या नियुक्त्या होणार का, हाही प्रश्नच आहे.

नियुक्त्यांना विरोधसेवानिवृत्त शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्याच्या शासनाच्या निर्णयाला सध्या जोरदार विरोध होत आहे. सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी तरुण बेरोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांसह इतरांनीही केली आहे. त्यामुळे या निर्णयाचा शासन फेरविचार करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी