सेवानिवृत्त कॅप्टन बाळासाहेब मोहारेचे कोरेगावात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:26+5:302021-07-09T04:14:26+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील कॅप्टन बाळासाहेब मोहारे नुकतेच सेवानिवृत्त होऊन गावाकडे परतले असून त्यांचे सैनिक ग्रुप व ...

Retired Captain Balasaheb Mohare welcomes in Koregaon | सेवानिवृत्त कॅप्टन बाळासाहेब मोहारेचे कोरेगावात स्वागत

सेवानिवृत्त कॅप्टन बाळासाहेब मोहारेचे कोरेगावात स्वागत

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील कॅप्टन बाळासाहेब मोहारे नुकतेच सेवानिवृत्त होऊन गावाकडे परतले असून त्यांचे सैनिक ग्रुप व ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले.

यावेळी फौजी ग्रुपच्या वतीने नारायण मोरे, संभाजी महाडिक व ग्रामस्थांच्या वतीने कॅप्टन मोहारे यांचे स्वागत व गौरव करण्यात आला. मोहरे १९८९ मध्ये लष्करात भरती झाले. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हलाखीची असताना केवळ जिद्द आणि मेहनत याच्या जोरावर सैन्यात ४ मराठा इन्फंट्री रेजिमेंटमधून त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर तीन महिन्यांची कमांडो ट्रेनिंग करून ते ब्लॅक कमांडो झाले. देशातील सर्वोत्तम स्पेशल फोर्समध्ये त्यांनी सेवा केली. शिपाई पदापासून कॅप्टन पदापर्यंत पोहोचले.

२१ प्यारा स्पेशल फोर्स रेजिमेंटचे सुभेदार मेजर हे पदही त्यांनी भूषविले. यावेळी कोरेगाव येथील आजी-माजी सैनिक, सरपंच ज्ञानेश्वर कवडे, लोक जागरण फाउंडेशनचे संस्थापक पंढरीनाथ साबळे, बाबासाहेब रणसिंग, माजी सभापती भैया लगड, चिखली सोसायटी अध्यक्ष रामदास झेंडे, माजी सरपंच कैलास इंगावले, फत्तूभाई सय्यद, ईश्वर मोहारे उपस्थित होते.

---

०८ कोरेगाव मोहारे

कॅप्टन बाळासाहेब मोहारे सेवानिवृत्त होऊन गावाकडे परतल्याने कोरेगाव येथे त्यांचे स्वागत व गौरव करताना ग्रामस्थ.

Web Title: Retired Captain Balasaheb Mohare welcomes in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.