कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST2021-08-25T04:26:11+5:302021-08-25T04:26:11+5:30
कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा परिसर मोठा असून, ८९ गावे कार्यक्षेत्रातील संबंधितांचा दैनंदिन व्यवहार कोपरगाव बाजार समितीशी निगडित आहे. ...

कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करा
कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा परिसर मोठा असून, ८९ गावे कार्यक्षेत्रातील संबंधितांचा दैनंदिन व्यवहार कोपरगाव बाजार समितीशी निगडित आहे. सोमवार आठवडे बाजाराचा दिवस असून, आसपासच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शेळी मेंढी पालन करून, त्यावर चरितार्थ चालवणाऱ्या घटकांची संख्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे, परंतु कोरोनामुळे जनावरांचा बाजार बंद असल्याने त्याचा अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. जनावरांची खरेदी-विक्री व्यवहार बंद असल्याने, त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करून, जनावरांचा बाजार सुरू व्हावा, म्हणून प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. राज्यातील अन्य बाजार समिती कार्यक्षेत्रात बहुतांश ठिकाणी जनावरांचे बाजार सुरू झालेले आहेत.