संजीवनी अकॅडमी आयोजित रिडेथाॅन स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST2021-01-13T04:52:14+5:302021-01-13T04:52:14+5:30
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी प्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचायचे होते. पुस्तक वाचल्यानंतर काय वाचले यांचे ...

संजीवनी अकॅडमी आयोजित रिडेथाॅन स्पर्धेला प्रतिसाद
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी प्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचायचे होते. पुस्तक वाचल्यानंतर काय वाचले यांचे कथाकथन करून त्याचा व्हिडिओ तयार करून तो संजीवनी अकॅडमीकडे ऑनलाईन पाठवायचा होता. कथाकथन करताना अनेक विद्यार्थ्यानी त्यांच्या कथेशी निगडित वेशभूषा करून देखावेही सादर केले. परीक्षकांनी तीन गटांचे व्हिडिओ परीक्षण केले आणि प्रत्येक गटातून सात विजयी विद्यार्थी निवडले. दूरभाष्य प्रणालीच्या माध्यमातून मनाली केाल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्या म्हणून साईनाथ हाॅस्पिटल, शिर्डीच्या डाॅ. मधुरा जोशी आणि प्राचार्य सुंदरी सुब्रमण्यम व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डीच्या प्राचार्या रचना कामत यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. यात विजेत्यांची नावे व रोख बक्षिसांची रक्कम घोषित करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यामध्ये श्लोक दवंगे, अँव्होनिका सोलंकी, संहिता नरोडे, अर्णव मोढे, स्वरा आढाव, जान्हवी पटेल, राजविका कोल्हे, सुरभी कोकणे, समन्वी शिंदे, विजयालक्ष्मी आढाव, वैष्णवी भडकवाडे, अथर्व देवकाते, ओवी जपे, सई पांचाल, साची अग्रवाल, तन्मयी कडू, शिवेंद्रत्या देशमुख, कनिका सावंत, अनुष्का जपे, आरती कारवा, अक्षोली वाघ यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्याचे माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हेे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी कौतुक केले.
--