मोबाइल रिटेल असोसिएशनच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:58+5:302021-09-13T04:20:58+5:30
शहरात बडी साजन सभागृहात शनिवारी आयोजित शिबिराचे आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, ...

मोबाइल रिटेल असोसिएशनच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
शहरात बडी साजन सभागृहात शनिवारी आयोजित शिबिराचे आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, योगेश झवर, प्रा.माणिकराव विधाते, नगरसेवक संजय चोपडा, विकी जगताप, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, जिल्हा अध्यक्ष अजित पवार, गोरख पडोळे, मनीष चोपडा, अमित बुरा, रितेश सोनी, सुमतीलाल कोठारी, यश मेहता, सुदाम वांढेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले संपूर्ण भारतभर ऑल इंडिया मोबाइल रिटेल असोसिएशनने एकाच दिवशी रक्तदानाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कुठलाही व्यवसाय करीत असताना संघटना स्थापन करून संघटित होण्याची गरज आहे.यातून संकटकाळात एकमेकांना मदत होते. प्रास्ताविक अमित बुरा यांनी केले व सूत्रसंचालन अजित पवार यांनी केले तर आभार गोरख पडोळे यांनी मानले.
---------------------------
फोटो १२ रक्तदान शिबिर
ओळी - ऑल इंडिया मोबाइल रिटेल असोसिएशनच्यावतीने बडी साजन सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते उद्घाटन झाले.