आश्वी येथील रक्तदान शिबिरात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:12+5:302021-07-14T04:25:12+5:30
आदरणीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त जैन नवकार ग्रुप, मोटर चालक-मालक संघटना, आश्वी बुद्रुक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१२) ...

आश्वी येथील रक्तदान शिबिरात प्रतिसाद
आदरणीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त जैन नवकार ग्रुप, मोटर चालक-मालक संघटना, आश्वी बुद्रुक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१२) जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रारंभी स्व.जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आश्वी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी, मोटर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बबनराव खेमनर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज पटवा, फार्मासिस्ट असोसिएशनचे राजेंद्र भंडारी, हर्षल खेमनर, वैभव भंडारी, लोकमतचे पत्रकार योगेश रातडीया, संजय गायकवाड, अनिल शेळके आदी उपस्थित होते.
शिबिरासाठी आधार रक्तपेढीचे संस्थापक प्रदीप जाधव, हनुमंत खोचरे, अजय वाकचौरे, काजल बावनथडे, प्रीती घोडके यांनी सहकार्य केले. शिबिरात प्रतिभा वाघ या तरुणीने पहिल्यांदाच रक्तदान करत दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प केला.
डॉ.रेश्मा शेख, भाऊसाहेब गायकवाड, किरण गायकवाड, चांगदेव खेमनर, गिरीश खेमनर, समीर गांधी, अभिजीत गांधी, किरण गांधी, प्रशांत गांधी, विकास मदने, गणेश जऱ्हाड, राहुल ताजणे, गणेश पांढरे, हर्षल खेमनर, रवींद्र म्हस्के, भगवान बोरा, गणेश पांढरे, महेश बालोटे, सागर शिंदे, अभिजीत मदने, सुमेध उंबरकर, विवेक जगताप, पंकज महानुभाव, नीलेश वाघमारे, सचिन बोर्ड, तेजस पाथरकर, इम्रान शेख, अजय शेंडगे, महेश सारबंदे, पोपट भुसाळ, संदीप खेमनर, नानासाहेब गायकवाड, औदुंबर कुंभकर्ण, दिलावर शेख, दत्तात्रय आंधळे, रियाज शेख, अशोक खेमनर, सुरेश बिडवे, शरद भडकवाड, जनार्दन उंबरकर, योगेश लुंकड, बाबासाहेब दिवे, किशोर शिंदे यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रीतम गांधी, विनित गांधी, पंकज नाके, सनी भंडारी, अथर्व रताडीया, रितेश भंडारी, नितिन गांधी, अभिजीत बिहाणी, नीलेश चोपडा, रोहित भंडारी आदींनी परिश्रम घेतले.
............
पती-पत्नी, भावाभावांचे रक्तदान
अविनाश गांधी व सुनीता गांधी, कपिल कुंभकर्ण व अर्चना कुंभकर्ण या पती-पत्नीने सोबत रक्तदान केले, तसेच योगेश रताडीया, नीलेश रताडीया, सागर रताडीया आणि सुमतीलाल गांधी, अविनाश गांधी या भावाभावांनी रक्तदान केले.
..........
१२ आश्वी रक्तदान