गुणवंत विद्यार्थ्यांचा जवळा येथे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:01+5:302021-09-18T04:22:01+5:30
नान्नज : रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे दोन विद्यार्थी राष्ट्रीय दुर्बल घटक ...

गुणवंत विद्यार्थ्यांचा जवळा येथे सन्मान
नान्नज : रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे दोन विद्यार्थी राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्तीस पात्र झाले. या विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार रुपयांप्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामध्ये मिताली महावीर पोफळे, आदित्य उमेश हजारे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांचा सन्मान जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, माजी उपसभापती दीपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक देवमाने, दयानंद कथले, दशरथ हजारे, माजी उपसरपंच रामलिंग हजारे, सावता ग्रुप अध्यक्ष प्रमोद कोल्हे, ईश्वर हजारे, अनिल हजारे, अमोल हजारे, अशोक हजारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---
१७ नान्नज सन्मान