शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मनधरणी

By admin | Updated: January 15, 2016 23:28 IST

शेवगाव : शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बहुमत मिळालेले नसल्याने चार अपक्ष नगरसेवकांच्या भूमिकेस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

शेवगाव : शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बहुमत मिळालेले नसल्याने चार अपक्ष नगरसेवकांच्या भूमिकेस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.शेवगाव शहरात गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराविरोधात शहरवासियांनी दिलेला कौल व शहर विकासाचा सर्वांगिण विचार करून अपक्षांनी भाजपच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केले आहे.यासंबंधीच्या निवेदनात शहराध्यक्ष सुरवसे व फुंदे यांनी म्हटले आहे, शेवगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्या कार्यकाळात लोकांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आदी मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागल्याने शेवगावची अवस्था एखाद्या भकास खेड्यासारखी झाली आहे. केंद्र व राज्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असूनही शहरात या दुर्दशेला सर्वार्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याने जनतेने आपला रोष मतपेटीतून व्यक्त केलेला आहे.तसेच आपल्या प्रभागासह शहरात शासनाच्या विविध विकासात्मक योजनांचा थेट लाभ मिळावा, याकरिता अपक्ष नगरसेवकांनी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन या निवेदनात शहराध्यक्ष सुरवसे व फुंदे यांनी केले आहे. पदाधिकारी निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)