सदगुरूवाडीत शिवजयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:50+5:302021-02-21T04:40:50+5:30
तिसगाव : सद्गुरूवाडी (ता. पाथर्डी) येथील आनंदवनमध्ये निसर्गाच्या सानिध्यात शिवपूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रमदान करून प्लास्टिक ...

सदगुरूवाडीत शिवजयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्तीचा संकल्प
तिसगाव : सद्गुरूवाडी (ता. पाथर्डी) येथील आनंदवनमध्ये निसर्गाच्या सानिध्यात शिवपूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रमदान करून प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करण्यात आला. यावेळी कापडी पिशवी भेट देऊन प्लास्टिक पिशवी वापर थांबविण्याचा आग्रह धरण्यात आला. तिसगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, सिद्धीविनायक प्रतिष्ठाण, साई सेवा प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांनी आनंदवनमध्ये श्रमदान केले. झाडांना पाणी देण्यात आले. निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी विद्यार्थ्यांच्या निसर्ग फेरीचे आयोजन केले होते. श्रमदानासाठी भाऊसाहेब लवांडे, विष्णूपंत पवार, पुरुषोत्तम आठरे, मांडवेचे सरपंच राजू लवांडे, विधीज्ञ गणेश शिंंदे, जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, विठ्ठल राठोड, शिवाजी जाधव, प्रियंका जाधव, लहू बोराटे, नीता राठोड यांनी परिश्रम घेतले.