श्रीगोंदा : ३० वर्षे आमदारकी, १३ वर्षे मंत्रीपद भोगणाऱ्या आ.बबनराव पाचपुतेंना कुकडीच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली ही दुर्दैवी बाब आहे. आता रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमदारकीचा राजीनामा देऊन घराचा रस्ता धरावा असा टोला कुकडी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी मारला आहे.जगताप पुढे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी आम्ही मोर्चे, उपोषण, आंदोलन केली की, आ.पाचपुते व सदाअण्णा पाचपुते म्हणायचे आंदोलनामुळे आवर्तनात अडचणी येतात, घोटाळे होतात. आता निवडणूक डोळ्यासमोर आल्याने पाचपुतेंना रस्त्यावर उतरण्याची नामुष्की आली आहे. हे ३०-३५ वर्षाच्या सत्तेचे अपयश आहे.कुकडी साखर कारखान्यावर आर.जे. ग्रुपने आयोजित केलेल्या मेळाव्याशी आपला कोणताही संबंध नव्हता. मी तन मन धनाने काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेस नेत्यांच्या दौऱ्यात सहभागी होणार आहे. आर.जे. ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस कोअर कमिटीला निमंत्रण दिले होते ते का उपस्थित राहिले नाही हे मला सांगता येणार नाही असेही जगताप म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)सत्ता परिवर्तनावर ठाम.. पुढील विधानसभा निवडणुकीत जगतापांना मदत करणार असा शब्द आपण जगतापांना दिला नव्हता असे राजेंद्र नागवडेंनी सांगितले आहे. याकडे लक्ष वेधले असता जगताप म्हणाले, शब्द दिला होता की नाही हे परमेश्वराला माहीत परंतु मी व नागवडे सत्ता परिवर्तनावर ठाम आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असे जगताप म्हणाले.
आमदारकीचा राजीनामा द्या
By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST