प्रवरा नदीत बुडालेल्या महिलेस वाचविले; आत्महत्येचा केला प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:38 IST2020-03-01T18:37:25+5:302020-03-01T18:38:27+5:30
श्रीरामपूर राहुरी मार्गावरील पुलावरून प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले. महिलेवर औषधोपचार सुरू आहेत.

प्रवरा नदीत बुडालेल्या महिलेस वाचविले; आत्महत्येचा केला प्रयत्न
बेलापूर : श्रीरामपूर राहुरी मार्गावरील पुलावरून प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले. महिलेवर औषधोपचार सुरू आहेत.
बेलापूर येथे रविवारी आठवडेबाजार होता. उक्कलगाव (आठवाडी) येथील एक २२ वर्षीय महिला रागारागाने घरातून निघून प्रवरेवरील पुलावर आली. मी विषारी औषध घेत असून नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत असल्याचे तिने पतीला फोनवर सांगितले. त्यानंतर लगेच पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली.
आठवडे बाजारामुळे पुलावर नागरिकांची गर्दी होती. त्यांनी आरडाओरड करताच लोक बचावासाठी धावले. यावेळी वाहतूक ठप्प झाली. काही धाडसी नागरिकांनी तिला पाण्याबाहेर काढले. किरण बारहाते,दीपक महाडीक, दिलीप दायमा यांनी साहस दाखविले.
बेलापूर पोलीस ठाण्याचे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, बाळासाहेब गुंजाळ, निखील तमनर, पोपट भोईटे तातडीने घटनास्थळी आले. यानंतर गावातील रुग्णालयात तिला औषधोपचाराकरिता हलविण्यात आले.