ममदापूर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 15:59 IST2020-06-02T15:58:54+5:302020-06-02T15:59:31+5:30
राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल मंगळवारी (दि.२) प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे.

ममदापूर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह
कोपरगाव : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल मंगळवारी (दि.२) प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे.
मागील महिन्यात सोमवारी (दि.२५मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. दिवसभर तेथेच वास्तव्यास होता. दरम्यान तो तरुण पॉझिटिव्ह सापडल्याने सोमवारी (दि.१ जून ) गोधेगाव येथील एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारनटाईन करण्यात आले आहे.
यामध्ये २ पुरुष, एका आजीसह ६ महिलांचा समावेश आहे. यातील थेट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींचे स्त्राव सोमवारी अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविले होते.