शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणामुळे मंत्र्यांचे दूरवरून देवदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 05:09 IST

मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे.

अहमदनगर : मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील या यात्रेला प्रत्यक्ष उपस्थित न राहता दूरवरुनच ‘देवदर्शन’ घेत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे.कर्जत येथे संत सद्गुरु गोदड महाराजांची दरवर्षी आषाढीनंतरच्या एकादशीला यात्रा असते. बुधवारी यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्त भव्य रथयात्रा निघते. त्याला सुमारे एक लाख लोक जमतात. यात्रेला विविध नेतेमंडळीही हजेरी लावतात. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोणत्याही नेत्याने या यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. अनेक राजकारण्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिकाच जाहीर केलेली नाही. त्यामुळे जनतेत राजकारण्यांबाबत संताप असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली होती.त्यामुळे मंत्री शिंदे यांनी यात्रेला उपस्थित न राहण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. ‘आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. दरवर्षी मी यात्रेला उपस्थित राहतो. मात्र, यावर्षी सकल मराठा समाजाच्या भावना विचारात घेता यात्रेला उपस्थित न राहता दूरवरुनच गोदड महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम करतो’, असे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होणार होती़ परंतु, तीही मराठा आंदोलनामुळे पुढे ढकलली़

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण