रेमडेसिविर बारामतीत मिळतात, जामखेडमध्ये का नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST2021-05-12T04:21:45+5:302021-05-12T04:21:45+5:30
जामखेड शहरातील नऊ खाजगी कोविड सेंटरला मंगळवारी राम शिंदे यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत ...

रेमडेसिविर बारामतीत मिळतात, जामखेडमध्ये का नाही
जामखेड शहरातील नऊ खाजगी कोविड सेंटरला मंगळवारी राम शिंदे यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले,
येथील लोकप्रतिनिधींनी प्रसिद्धी मिळवावी; पण स्वतः अर्थसाहाय्य करून प्रसिद्धी मिळवावी. सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. डॉ. आरोळे कोविड सेंटर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. प्रशासनाने येथील भार कमी करण्यासाठी तालुक्यातील खर्डा, अरणगाव व नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करून तेथील रुग्णांवर तेथेच उपचार करावेत.
खासगी कोविड सेंटरला भेट दिल्यावर येथील डॉक्टरांच्या मते बेड शिल्लक आहेत; पण प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठा होत नाही. येथील अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे उपचार करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत, अशी टीका राम शिंदे यांनी केली.