कोपरगाव : कोरोना आजारावर रुग्णाला आवश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री मेडिकल तथा एजन्सीमार्फत सुरू आहे. मात्र, या इंजेक्शनची वाढती मागणी बघता बऱ्याच फार्मसी, मेडिकलद्वारे रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जात आहे. रुग्णांची होत असलेली लूट होत आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून होणारी थेट विक्री बंद करून प्रशासकीय यंत्रणेद्वारेच या इंजेक्शनची विक्री व्हावी, अशी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोटे म्हणाले, सध्या देशभर कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे, कोरोना रुग्णांचे नातेवाईक तथा घरचे मंडळी यांची रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी जात असताना प्रचंड लूट होत आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास व मेडिकल, एजन्सीद्वारे होणाऱ्या पिळवणुकीस सामोरे जावे लागत आहे. हे अन्यायकारक आहे. सर्वच औषधविक्रेते वाईट नाहीत; परंतु काही लोक या परिस्थितीचा फायदा घेत या इंजेक्शनचा पुरवठा दाबून ठेवण्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे. शासनाने गांभीर्याने याचा पुरवठा करत आरोग्य विभागामार्फत यावर काम करण्यात यावेत असेही पोटे यांनी म्हटले आहे.
...........
०८ थोरात