शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जामखेडमध्ये धार्मिक स्थळी आढळले १४ परदेशी नागरिक ;  तीन ट्रस्टींविरुध्द गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 09:05 IST

जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धार्मिक स्थळामध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता रहात असल्याचे  उघड झाले आहे. याप्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुरुवारी (२६ मार्च) रात्री जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जामखेड : जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धार्मिक स्थळामध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता रहात असल्याचे  उघड झाले आहे. याप्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुरुवारी (२६ मार्च) रात्री जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे परदेशी नागरिक आयव्हरी कोस्ट, इराण, टांझानिया देशांतील तर इतर मंबई व तमिळनाडू राज्यातील आहेत. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप मच्छिंद्र आजबे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दि. २५ मार्च रोजी सकाळी फिर्यादी पो. कॉ. संदीप मच्छिंद्र आजबे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक   निलेश कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू गव्हाणे, गणेश साने व बेलेकर हे त्यांच्या शासकीय वाहनाने जामखेड शहरात जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादृर्भाव रोखण्यासाठी  पेट्रोलिंग करीत होते. याच दरम्यान त्यांना गुप्त खब-यामार्फत माहिती मिळाली होती.  जामखेड शहरातील एका धार्मिक स्थळाचे ट्रस्टी समीर बारूद, याकुब तांबोळी व आजीम सय्यद (सर्व रा. जामखेड) यांनी वरील आदेशाची माहिती असतानाही  दि. २५ मार्च रोजी या धार्मिक स्थळामध्ये १४ लोक एकत्र जमवून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरून वरील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे. कॉन्स्टेबल बापू गव्हाणे हे करीत आहेत. १४ जणांना ठेवले निगराणी कक्षातसर्व १४ परदेशी नागरिकांना नगर येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली. जामखेडमध्ये असताना त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र ते परदेशातून आले असल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस अहमदनगर येथे डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा जामखेड तहसील प्रशासनाने दिला आहे. फक्त बाहेरच्या देशातून आले आहेत म्हणून त्यांना निगराणीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही, असे देखील स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या