चर्चमध्ये प्रवेशासाठी धर्मगुरुंचे उपोषण
By Admin | Updated: March 20, 2016 00:49 IST2016-03-20T00:42:09+5:302016-03-20T00:49:45+5:30
अहमदनगर : अहमदनगर पहिली मंडळी (कॅग्रीगेशनल) ह्यूम मेमोरिअल चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी जाणाऱ्या धर्मगुरू व भक्तांना अडथळा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी.

चर्चमध्ये प्रवेशासाठी धर्मगुरुंचे उपोषण
अहमदनगर : अहमदनगर पहिली मंडळी (कॅग्रीगेशनल) ह्यूम मेमोरिअल चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी जाणाऱ्या धर्मगुरू व भक्तांना अडथळा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी. सभासदांना घटना व नियमानुसार लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळ निवडण्याचे अधिकार मिळावेत, या मागणीसाठी हंगामी मॉडरेटर रेव्ह. सनी पी. मिसाळ, चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेव्ह. सुनील भांबळ, धर्मगुरू रेव्ह. संजय मिसाळ यांच्यासह भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांची भेटही घेतली.
ह्यूम मेमोरिअल चर्चचे हंगामी मॉडरेटर सी. बी. उजागरे यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर सेवाजेष्ठतेनुसार सनी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. ते चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी गेले असता विरोधी मंडळाने त्यांना भक्ती करण्यास अटकाव करत शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी धर्मगुरूंना चर्चमध्ये उपासना करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी जाणाऱ्या धर्मगुरू व भक्तांना अडथळा करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी. सभासदांना घटना व नियमानुसार लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळ निवडण्याचे अधिकार मिळावेत, सरकारी आॅडिटर यांच्यामार्फत संस्थेचे आॅडिट करण्यात यावे, चर्चच्या गेल्या दहा वर्षातील पैशांचा हिशोब घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात रेव्ह. मिसाळ, सेक्रेटरी रेव्ह.भांबळ, यांच्यासह नंदप्रकाश शिंदे, प्रकाश कांबळे, रुबेन त्रिभूवन, विनोद भालेराव, शारदा वाघमारे, श्रद्धा बावर, प्रिया मिसाळ यांच्यासह भाविक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)