पॉझिटिव्ह रुग्ण घटल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST2021-04-21T04:22:05+5:302021-04-21T04:22:05+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात रोज ३२०० ते ३५०० रुग्ण बाधित होत आहेत, मात्र मंगळवारी प्रथमच हा आकडा कमी झाल्याने नागरिकांसह ...

पॉझिटिव्ह रुग्ण घटल्याने दिलासा
अहमदनगर : जिल्ह्यात रोज ३२०० ते ३५०० रुग्ण बाधित होत आहेत, मात्र मंगळवारी प्रथमच हा आकडा कमी झाल्याने नागरिकांसह यंत्रणेला थोडा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात २७९५ नवे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी २६३१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १९ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८८ टक्के इतके झाले आहे. मंगळवारी जिल्ह्यात रूग्ण संख्येत २७९५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१ हजार २७७ इतकी झाली आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने २३ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६९१ आणि अँटिजेन चाचणीत १४९६ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १८२, अकोले १, जामखेड १, कर्जत ७९, कोपरगाव ३३, नगर ग्रामीण २०, नेवासा १४, पारनेर ४३, पाथर्डी ३, राहाता १३, राहुरी ६, संगमनेर ८८, शेवगाव ३३, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ८२, कँटोन्मेंट बोर्ड ८ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर २३०, अकोले २, जामखेड १, कर्जत १३, कोपरगाव ३४, नगर ग्रामीण ६७, नेवासा १८, पारनेर २६, पाथर्डी १२, राहाता ७६, राहुरी २९, संगमनेर २७, शेवगाव १८, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ५३, कँटोन्मेंट बोर्ड ४ आणि इतर जिल्हा ५९ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत मंगळवारी १४९६ जण बाधित आढळून आले. नगर शहर २३८, अकोले ८७, जामखेड २५, कर्जत ६८, कोपरगाव ४८, नगर ग्रामीण १९५, नेवासा १५२, पारनेर ७६, पाथर्डी ७९, राहाता १२७, राहुरी १२३, संगमनेर २४, शेवगाव ५७ श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ९४, कॅन्टोन्मेंट बोर्ड ९ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
---------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : १,१९,२४१
उपचार सुरू असलेले रूग्ण : २१२७७
मृत्यू : १६३५
एकूण रूग्ण संख्या:१,४२,१५३