संगमनेरमध्ये गायींची सुटका
By Admin | Updated: May 6, 2016 23:22 IST2016-05-06T23:10:17+5:302016-05-06T23:22:40+5:30
संगमनेर : शहर पोलिसांनी मदिनानगर भागात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १३ जर्सी गायींची सुटका केली.

संगमनेरमध्ये गायींची सुटका
संगमनेर : शहर पोलिसांनी मदिनानगर भागात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १३ जर्सी गायींची सुटका केली.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पथकासह मदिनानगर भागात छापा टाकून मोकळ्या जागेत बांधून ठेवलेल्या १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ जर्सी गायी जप्त केल्या. पकडलेल्या सर्व गायी जीवदया मंडळाच्या पांजरापोळमध्ये पाठवून त्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सुफीयान नसीर कुरेशी (रा. मदिनानगर) याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)