साईनगरीतील विकेंड लॉकडाऊन शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:24+5:302021-07-25T04:19:24+5:30
प्रत्येक शनिवार व रविवारी भाविकांची साई मंदिराच्या कळसाचे दर्शनासाठी गर्दी होत असते. याच दिवशी लॉकडाऊन असल्याने भाविकांची शिर्डीत मोठी ...

साईनगरीतील विकेंड लॉकडाऊन शिथिल करा
प्रत्येक शनिवार व रविवारी भाविकांची साई मंदिराच्या कळसाचे दर्शनासाठी गर्दी होत असते. याच दिवशी लॉकडाऊन असल्याने भाविकांची शिर्डीत मोठी गैरसोय होते़ गुरूपौर्णिमेनंतर येणाऱ्या शनिवारी ही हीच परिस्थिती होती़ भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवार व रविवारचा लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे़ त्या ऐवजी दुसरे दोन दिवस लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ निवेदनावर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, विजय जगताप, बाबासाहेब कोते, सचिन कोते, राहुल गोंदकर, संजय शिंदे, अमृत गायके, उत्तम कोते, दत्ता कोते, अनिल पवार, सुनील बाराहाते, बाळासाहेब जगताप, गिरीष सोनेजी, मच्छिंद्र गायके यांची नावे आहेत़
या निवेदनाच्या प्रति संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत़