बसस्थानकावरील मोटारसायकलींची गर्दी कमी करा
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:58+5:302020-12-05T04:37:58+5:30
दहिगावने : दररोज सकाळी गावाच्या मुख्य चौकात रस्त्याच्या दुतर्फा मोटारसायकलींची गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, ...

बसस्थानकावरील मोटारसायकलींची गर्दी कमी करा
दहिगावने : दररोज सकाळी गावाच्या मुख्य चौकात रस्त्याच्या दुतर्फा मोटारसायकलींची गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, अशी मागणी दहिगावने (ता. शेवगाव) ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सरपंच सुभाष पवार यांच्याकडे केली आहे.
गावाच्या मुख्य चौकात रोज सकाळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची भली मोठी रांग लागते. त्यामुळे दळणवळणात व्यत्यय निर्माण होतो. अपघात होण्याचीही शक्यता आहे. याकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून त्या गर्दीला आळा कसा बसेल याचे नियोजन करावे. तसेच गेल्या ५० वर्षांपासून येथे आठवडी बाजार भरतो. परंतु, आजपर्यंत येथे बाजारतळ सुस्थितीत नाही. सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या गावात कचरा व्यवस्थापन केले गेलेले नाही. तरी घंटागाडीचीही व्यवस्था करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर देविदास भेंडेकर, दत्तात्रय काशीद, सर्जेराव घनमोडे, मेजर कांबळे, संतोष घुले, सुदाम नीळ, शाम कर्डीले, लक्ष्मण काशीद, राजेंद्र चव्हाण, बाबा तांगडे, मनोज काळे आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.
कोट..
घंटागाडी व बाजारतळावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम मंजूर आहे. बसस्थानकावरील मोटारसायकलींची गर्दी कमी करणे गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वयंशिस्त पाळल्यास ही गर्दी आपोआप कमी होईल.
-सुभाष पवार,
सरपंच, दहिगावने
फोटो ओळी ०४ दहिगावने
दहिगावने ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन सरपंच सुभाष पवार यांना दिले.