लाल कांदा साडेचार हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:29+5:302020-12-13T04:35:29+5:30
पाच दिवसांपूर्वी दोन हजारांपर्यंत खाली घसरलेल्या कांद्याने पुन्हा उसळी घेतली असून गुरुवारी व आता शनिवारच्या लिलावात लाल कांदा ...

लाल कांदा साडेचार हजारांवर
पाच दिवसांपूर्वी दोन हजारांपर्यंत खाली घसरलेल्या कांद्याने पुन्हा उसळी घेतली असून गुरुवारी व आता शनिवारच्या लिलावात लाल कांदा साडेचार हजारांपर्यंत विकला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी लाल कांद्याची आवक दहा हजार क्विंटल होती. ती आता वाढून शनिवारच्या लिलावात २६ हजार ६७५ क्विंटल झाली. यामध्ये प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ३५०० ते ४५०० प्रति क्विंटलचा भाव निघाला.
गावरान कांद्याचेही दर टिकून आहेत. मात्र पूर्वीपेक्षा आता गावरान कांद्याची आवक कमी होत आहे. शनिवारच्या लिलावात १३४८३ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली आणि यामध्ये प्रथम प्रतवारीच्या कांद्याला २८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
---------------
शनिवारच्या लिलावातील भाव
(गावरान)
प्रथम प्रतवारी २८०० ते ३५००
द्वितीय २२०० ते २८००
तृतीय १००० ते २२००
चतुर्थ ५०० ते १०००
---------------
(लाल कांदा)
प्रथम प्रतवारी ३५०० ते ४५००
द्वितीय १८५० ते ३५००
तृतीय १००० ते १८५०
चतुर्थ. ५०० ते १०००
---------------