एकाच दिवसात २० लाखांची वसुली

By Admin | Updated: October 27, 2016 00:50 IST2016-10-27T00:30:45+5:302016-10-27T00:50:37+5:30

अहमदनगर : वाडिया पार्कमधील गाळे, शहरातील मोठे थकबाकीदार हॉटेल चालक, मंगल कार्यालयाच्या मालकांना मालमत्ता जप्त करण्याची तंबी देताच

Recovery of 20 lakhs in a single day | एकाच दिवसात २० लाखांची वसुली

एकाच दिवसात २० लाखांची वसुली


अहमदनगर : वाडिया पार्कमधील गाळे, शहरातील मोठे थकबाकीदार हॉटेल चालक, मंगल कार्यालयाच्या मालकांना मालमत्ता जप्त करण्याची तंबी देताच पालिकेच्या तिजोरीत बुधवारी एकाच दिवसात २० लाख रुपये जमा झाले़ उपायुक्त अजय चारठाणकर यांनी शहरातील चारही झोनमध्ये बुधवारी वसुली मोहीम राबविली.
वाडिया पार्कमध्ये २१४ गाळे आहेत. त्यामध्ये ७६ गाळ््यांची मालमत्ताकराची आकारणी करण्याचे काम झालेले नाही. उर्वरित गाळेधारकांनी गुरुवारी (दि.२७) सकाळी दहापर्यंत करभरणा न केल्यास गाळे सील करण्याचा इशारा चारठाणकर यांनी दिला आहे.

Web Title: Recovery of 20 lakhs in a single day