‘वृद्धेश्वर’च्या शिखर उभारणीस मान्यता
By Admin | Updated: August 19, 2014 02:15 IST2014-08-19T01:48:00+5:302014-08-19T02:15:39+5:30
करंजी : श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिराच्या जीर्ण झालेल्या शिखराची उभारणी करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे़ त्यामुळे शिखर उभारणी आणि

‘वृद्धेश्वर’च्या शिखर उभारणीस मान्यता
करंजी : श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिराच्या जीर्ण झालेल्या शिखराची उभारणी करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे़ त्यामुळे शिखर उभारणी आणि जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे़ त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही सहाय्यक धर्मादाय आयुक्त (पुणे) शिवकुमार दिघे यांनी दिल्या़
पुणे येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनी वृद्धेश्वर येथे येऊन नुकतीच महापूजा व अभिषेक केला़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी मंदिराबाबत दिघे यांना माहिती दिली़ हे मंदिर सहाशे वर्षापूर्वीचे असून, मंदिराच्या मुख्य शिखराची डागडूजी करणे आवश्यक असल्याचे सांगितले़ पुरातन मंदिराची पडझड होऊ नये व काही अनर्थ होण्यापूर्वीच मंदिराचे काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत दिघे यांनी या कामास सहमती दर्शविली़ यावेळी देवस्थानच्यावतीने दिघे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़ यावेळी देवस्थान समितीचे विश्वस्त आबासाहेब पाठक, रंगनाथ केकाण, शिवाजी चोथे, विष्णू पाठक आदी उपस्थित होते़
(वार्ताहर)