भिंगारमध्ये सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:42+5:302021-02-26T04:27:42+5:30

या बैठकीत डॉ. राजेंद्र फडके यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे, मुद्रा लोन योजनेचे व उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार ...

Reception of beneficiaries of government schemes in Bhingar | भिंगारमध्ये सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार

भिंगारमध्ये सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार

या बैठकीत डॉ. राजेंद्र फडके यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे, मुद्रा लोन योजनेचे व उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राजेंद्र फडके म्हणाले, बूथ रचना हा भाजपचा पाया आहे. याच पायावर संपूर्ण देशात भाजपाचे कामकाज होत आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात, मंडलामध्ये बूथ रचना उत्कृष्टपणे व्हावी यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील सर्व जनतेच्या उद्धारासाठी शेकडो लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जनतेपर्यंत योजना पोहाेचवण्याचे काम बूथ रचनेद्वारे व्हावे. यावेळी शहर कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत तिवारी, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, दीपक फळे, छत्तूशेठ मेवानी, अतुल मुनोत, संजय स्वामी, श्रीमती रॉक, कृष्णा पारेकर, राजेश फुलारे, संजय सदलापूरकर, कार्तिक जाधव, किरण सपकाळ, नाफिसा नगरवाला व कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक फळे यांनी आभार मानले.

Web Title: Reception of beneficiaries of government schemes in Bhingar