अहमदनगर : नगरमध्ये पहिले तीनही कोरोनाबाधित रूग्ण आता बरे झाले आहेत. आज सायंकाळी तिस-या रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.नगरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २६ वर गेली आहे. त्यातील एकजण बीड जिल्ह्यातील आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील असलेल्या एका मतिमंद रूग्णाचे पुण्यातील ससूण रूग्णालयात उपचार घेताना आज निधन झाले. पहिल्या दोन रूग्णांना आधीच डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे बूथ हॉस्पिटलमध्ये सध्या २२ रूग्णांवर उपचार सुरू होते.दरम्यान तिस-या कोरोनाबाधित रूग्णाचे १४ व १५व्या दिवशीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून शुक्रवारी सायंकाळी बूथ हॉस्पिटलमधून या रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्या रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचा-यानी या रूग्णाला टाळ्या वाजवून निरोप दिला. आता पुढील १४ दिवस हा रूग्ण घरीच आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली राहणार आहे. दरम्यान आता बूथ हॉस्पिटल येथे २१ कोरोनाबाधित दाखल आहेत.
Coronavirus : दिलासादायक : तिस-या कोरोनाबाधित रूग्णाला अखेर डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:05 IST