वस्तुस्थिती समजून घेत न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:27+5:302021-07-21T04:15:27+5:30
जागरण गोंधळाचे कार्यक्रम करणाऱ्या एका लोककलावंत महिलेवर १ मार्च रोजी रात्री निंबोडी (ता. नगर) परिसरात तिघांनी अत्याचार करत तिच्याकडील ...

वस्तुस्थिती समजून घेत न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन
जागरण गोंधळाचे कार्यक्रम करणाऱ्या एका लोककलावंत महिलेवर १ मार्च रोजी रात्री निंबोडी (ता. नगर) परिसरात तिघांनी अत्याचार करत तिच्याकडील पैसे लुटले होते. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. यातील आरोपी आकाश मळूराम पोटे याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश मंजुषा व्ही. देशपांडे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. या अर्जावर पीडित महिलेने ॲड. सुरेश लगड यांच्यामार्फत न्यायालयास विनंती केली होती की, आरोपी पोटे यास जामीन मंजूर केल्यानंतर माझ्या जीविताला धोका निर्माण होईल. आरोपींनी माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अत्याचार केला आहे. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करू नये. दरम्यान, पीडित महिलेने दुसऱ्या वकिलामार्फत पुन्हा न्यायालयात म्हणणे सादर करून आरोपीस जामीन देण्यास हरकत नाही, असे लिहून दिले होते. न्यायालयाने मात्र वस्तुस्थिती लक्षात घेत आरोपीकडून फिर्यादी व साक्षीदारावर दबाव येऊ शकतो, तसेच आरोपी जामिनावर सुटल्यानंतर तो मिळून येणार नाही. त्यामुळे आरोपीचा जामीन नामंजूर करणे योग्य राहील, असे याप्रकरणी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.