सावित्रीबाई महाविद्यालयात वाचन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:32+5:302021-06-22T04:15:32+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व मराठी विभाग ...

Reading Day celebrated at Savitribai College | सावित्रीबाई महाविद्यालयात वाचन दिन साजरा

सावित्रीबाई महाविद्यालयात वाचन दिन साजरा

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन दिन साजरा करण्यात आला. नगरच्या न्यू, आर्टस्‌ कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा.डॉ. नंदकुमार उदार यांनी ‘आजची वाचन संस्कृती : स्वरूप व आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. ढगे होते. उपप्राचार्य डॉ. शांतिलाल घेगडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाला कुकडी शिक्षण संस्थेचे प्रमुख माजी आमदार राहुल जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. डी. एम. शेटे यांनी केले. ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एस. एम. ताकवणे यांनी आभार मानले.

Web Title: Reading Day celebrated at Savitribai College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.