राधाबाई काळे महिला महाविद्यालयात वाचन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:46+5:302021-06-20T04:15:46+5:30
पी.एन. पण्णीकर (केरळ) यांचा स्मृतिदिन म्हणून १९ जून हा वाचन दिन साजरा होतो. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य ...

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात वाचन दिन साजरा
पी.एन. पण्णीकर (केरळ) यांचा स्मृतिदिन म्हणून १९ जून हा वाचन दिन साजरा होतो. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ.संजय कांबळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून वाचनाचे महत्त्व पटवून दिले. वाचन करणाऱ्या व्यक्तीच खूप मोठ्या झाल्या आहेत. वाचनाने माणूस विचारशील, संयमी, हुशार बनतो, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनीही आपल्या मनोगतातून वाचनाने माणूस घडतो, व्यक्तिमत्त्व उजळून निघते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रामदास बर्वे, प्रा.नासीर सय्यद, प्रा.सतीश शिर्के, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा.चिंतामण धिंदळे यांनी केले. आभार प्रा.चंद्रशेखर खैरनार यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.योगिता रांधवणे यांनी केले.