असुविधेबाबत ग्रामस्थांकडून तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:06+5:302021-04-18T04:20:06+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार मोनिका राजळे यांनी शनिवारी (दि. १७) दुपारी अचानक भेट देऊन ...

असुविधेबाबत ग्रामस्थांकडून तक्रारींचा पाढा
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार मोनिका राजळे यांनी शनिवारी (दि. १७) दुपारी अचानक भेट देऊन पाहणी केली. येथील असुविधेबाबत ग्रामस्थांनी आमदार राजळे यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला.
जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून कर्मचारी स्टाफ वाढविणे व जास्तीत जास्त लसींचे डोस पुरविण्याबाबत आमदार राजळे यांनी सूचना केल्या.
जवळपास दहा-पंधरा वर्षांपासून येथील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ग्रामीण रुग्णालय पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी कोमात आहे. याचा फटका परिसरातील ३५ खेड्यांतील हजारो नागरिकांना बसत आहे. सध्या कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी अद्यापही वानवाच आहे. कोरोना लस वेळेवर मिळत नसल्याबाबत तक्रारींचा पाढाच नागरिकांनी आमदार राजळे यांच्या समोर मांडला. भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डाॅ. गोरख नागरगोजे, डाॅक्टर सेलचे तालुकाप्रमुख डाॅ. नीलेश मंत्री, सरचिटणीस राम केसभट, कांतीलाल चव्हाण, बबन घोरतळे, आकिल बागवान आदींसह आरोग्य सेविका, कर्मचारी उपस्थित होते.
..
१७ राजळे भेट
...
ओळी- बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना आमदार मोनिका राजळे. समवेत वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ.