रवि शास्त्री साईदरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:19 IST2019-05-21T18:19:31+5:302019-05-21T18:19:35+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आज दुपारी साईदरबारी हजेरी लावली़

रवि शास्त्री साईदरबारी
शिर्डी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आज दुपारी साईदरबारी हजेरी लावली़
गेली अनेक वर्षे साईबाबांना वर्षातून किमान एकदा हजेरी लावणारे रवि शास्त्री आज दुपारच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित होते़ आरतीनंतर संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांचा साईमुर्ती देवून सत्कार केला़ यावेळी मंदीर प्रमुख रमेशराव चौधरी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, धनजंय आठरे आदींची उपस्थिती होती़