लिखाण करताना राऊतांनी काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:37+5:302021-01-03T04:21:37+5:30

थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या कामाचे देशभरातून कौतुक झाले. विशेषत: ते कोरोना संकटाबाबत असेल किंवा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना ...

Raut should be careful while writing | लिखाण करताना राऊतांनी काळजी घ्यावी

लिखाण करताना राऊतांनी काळजी घ्यावी

थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या कामाचे देशभरातून कौतुक झाले. विशेषत: ते कोरोना संकटाबाबत असेल किंवा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना असेल. याचे कौतुक झाले ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. याबाबतीत शंका बाळगण्याचे काहीही कारण नाही. महाविकास आघाडीच्या निर्मितीवेळी सर्वसामान्य माणूस केंद्रिभूत मानून त्यांच्यासाठी काय चांगले करता येईल, यासाठी काम करण्याचा निर्णय झाला. आपल्या लक्ष, उद्दिष्टांची चर्चा संबंधितांबरोबर करणार आहे. उत्तरप्रदेशातील अनेक गावांची नावे बदलली आहेत; परंतु तेथील सर्वसामान्यांच्या जीवनात काय बदल झाला? नामांतरामुळे जो सामाजिक विद्वेष निर्माण होईल तो फायदेशीर ठरणारा नाही. ते उद्दिष्ट आमचे नाही. त्यामुळे नामांतराचा प्रस्ताव कोणी आणू नये.

Web Title: Raut should be careful while writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.