सांगवी फाट्यावर तासभर रास्तारोको
By Admin | Updated: July 7, 2014 23:47 IST2014-07-07T23:21:10+5:302014-07-07T23:47:22+5:30
श्रीगोंदा : भीमा नदीकाठावरील गावांना भेडसाविणाऱ्या वीजप्रश्नी नगर-दौंड मार्गावरील सांगवी फाट्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि़७) रास्तारोको आंदोलन केले़

सांगवी फाट्यावर तासभर रास्तारोको
श्रीगोंदा : भीमा नदीकाठावरील गावांना भेडसाविणाऱ्या वीजप्रश्नी नगर-दौंड मार्गावरील सांगवी फाट्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि़७) रास्तारोको आंदोलन केले़
तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे़ मात्र, सततच्या भारनियमनामुळे शेतीला पाणी देता येत नाही़ अनेकांच्या विहिरींना भरपूर पाणी असल्यामुळे तालुक्यातील शेतीला पाणी देणे शक्य आहे़ मात्र, महावितरणकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु आहे़ या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला़ सोमवारी सकाळी १० वाजता सांगवी फाट्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले़ या कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व साईकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष सदाअण्णा पाचपुते यांनी केले़ आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, भीमा नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची पातळी चांगली आहे़ परंतु वीजेअभावी ऊस जळत आहेत. महावितरण कंपनीने थकित विजबिल वसुल करताना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा़ भारनियमनही कमी करावे, अन्यथा शेतकऱ्यांचा सयंम सुटू शकतो, अशा इशारा दिला.
माजी सभापती पाचपुते म्हणाले की, सांगवीतील सबस्टेशनचे काम रखडले आहे़ हे काम करण्यासाठी मुहर्त कधी मिळणार, असा सवाल त्यांनी केला.
सुधीर नलगे म्हणाले की, तालुक्यातील विजेसंबंधीची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे़ सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परंतू अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी सैरभैर आहेत. यावेळी गणपतराव परकाळे, अनिल नलगे, संतोष नलगे यांची भाषणे झाली. उपअभियंता जाधव यांनी निवेदन स्विकारले आणि तीन महिन्यांत सांगवी सबस्टेशनचे काम होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हा रास्तारोको मागे घेतला़ (तालुका प्रतिनिधी)