रसाळ यांचे कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:40+5:302021-07-02T04:15:40+5:30
निघोज : प्रयोगशील शेतकरी राहुल अमृता रसाळ यांचे कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान राज्यासह देशातील शेतकऱ्यांनाही दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार ...

रसाळ यांचे कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान दिशादर्शक
निघोज : प्रयोगशील शेतकरी राहुल अमृता रसाळ यांचे कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान राज्यासह देशातील शेतकऱ्यांनाही दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार आमदार नीलेश लंके यांनी काढले.
पारनेर पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने निघोज (ता. पारनेर) येथे कै. वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनानिमित्त शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी पुरस्कार देऊन गौरविण्यत आले. यावेळी ते बोलत होते.
येथील उद्यान पंडित पुरस्कार विजेते शेतकरी राहुल रसाळ यांनी जैविक शेतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. मनोज कुंडलिक यांनी जिरेनियम शेतीविषयी, बाळासाहेब कारखिले यांनी सीताफळ शेतीविषयी, राजेंद्र गाडेकर यांनी चंदन शेतीविषयी, दीपक नरवडे यांनी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी रब्बी ज्वारी, गहू या पिकांचे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणाऱ्या राजदेव प्रल्हाद, अनिकेत देशमाने, संतोष राजदेव, सुधाकर दिवटे, संतोष शेंडकर, सीताबाई येवले या शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार ज्योती देवरे, जि. प. सभापती काशिनाथ दाते, सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, पंचायत समिती तालुका अधिकारी किशोर माने, पारनेर तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके, आत्मा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राहुल झावरे, माजी सभापती खंडुजी भुकन, संकेत लाळगे, विकास शेटे, ज्ञानेश्वर लंके, ठेकेदार सागर रसाळ, दत्तात्रय रसाळ, कृषी सहाय्यक संदीप गायकवाड, अर्चना बनकर, हनुमंत गाडीलकर, भारत बोर्डे, विवेका खैरे, चंद्रकांत क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन देवेंद्र जाधव यांनी केले. वैभव थोरवे यांनी आभार मानले.
-----
०१ निघोज
कृषी क्षेत्रातील उद्यान पंडित पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल रसाळ यांचा आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.