तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:31+5:302021-09-12T04:25:31+5:30

पिंपळगाव माळवी : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मीळ झाले आहे. ...

Rarely caused by herbicides | तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मीळ

तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मीळ

पिंपळगाव माळवी : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मीळ झाले आहे. ग्रामीण भागातही गणेशभक्तांना दुर्वा म्हणजेच हरळी या वनस्पतीसाठी भटकंती करावी लागत आहे.

पौराणिक कथेनुसार उष्ण गरळ ओकणारा अनलासूर राक्षसाचा गणेशाने वध केला होता. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे ऋषीमुनींनी गणेशाच्या डोक्यावर दुर्वांची जुडी अर्पण केली, अशी अख्यायिका आहे. परंतु, दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. डोळ्यांचे आजार, सोरायसिस, त्वचारोग, बेबी ऑईल, नागीन अशा आजारात या वनस्पतीचा उपयोग होतो. होमिओपॅथी व युनानी या पद्धतींमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. परंतु, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वनस्पती तण असल्यामुळे शेतातल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतातील उत्पन्न कमी करते. मजुरांचा अभाव यामुळे शेतकरी सर्रास या वनस्पतीचे तणनाशकाद्वारे निर्मूलन करतात. तग धरून जगण्याची जिद्द या वनस्पतीमध्ये आहे.

---

हरळी या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रानुसार ‘सायनाडोन डेक्लोलान’ नाव आहे. ही वनस्पती जगात सर्वत्र आढळते. हिला पशू आवडीने खातात. परंतु, शेतातील पिकांवर या वनस्पतीमुळे परिणाम होतो. त्यामुळेच शेतकरी तणनाशक वापरून तिचा नाश करतात.

- आर. जी. खोसे,

प्राध्यापक

Web Title: Rarely caused by herbicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.