दुर्मीळ सर्प आढळला
By Admin | Updated: June 8, 2014 00:34 IST2014-06-07T23:37:26+5:302014-06-08T00:34:54+5:30
संवत्सर: संवत्सर (ता. कोपरगाव) भीमवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुर्मीळ सर्प आढळून आला.

दुर्मीळ सर्प आढळला
संवत्सर: संवत्सर (ता. कोपरगाव) भीमवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुर्मीळ सर्प आढळून आला. अडीच-तीन फूट लांबी, भगवा रंग आणि त्यावर काळ्या पट्ट्या, संपूर्ण रचना मक्याच्या कणसासारखी असल्याने या सर्पाचे अमेरिकेतील कॉर्न स्नेकशी साधर्म्य आढळून येते.
संवत्सर परिसरात आढळलेला कॉर्न स्नेक हा अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा असून तो अमेरिकेतील पूर्व व दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात आढळतो़ तेथे मक्याचे विक्रमी उत्पादन केले जाते़ तेथे मकाच्या शेतात मोठ्या संख्येने ते राहतात़ तेथील उंदीर, घुशी, कीटक, पिकांवरील नाकतोडे तो खातो़ त्यांच्या वास्तव्याने पिकावरील रोगराई कमी होते़ तेथील क्षेत्र प्रदूषण मुक्त राहतो़ म्हणून त्यास शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात़ मशागत करायची असल्यास या सापांना लाकडी पेटीत हाताने धरून सुरक्षित ठेवले जाते़
कॉर्न स्नेकचे आयुष्यमान सात ते आठ वर्षे असते़ त्यांचे तोंड नागासारखे असल्याने त्यांना चुकून मारलेही जाते़ कॉर्न स्नेक एका वेळी १२ ते २४ अंडी देतो.
आठवड्याने त्यातून पिल्ले बाहेर येतात़ कॉर्न स्नेक रंगाने नारंगी, काळे पट्टे, चॉकलेटी, लाल, मातकट तर कधी पिवळासुध्दा असतो़ हा साप अमेरिकेच्या मका पिकात राहतो़ दिसण्यास मक्यासारखाच आहे़
शेतीसाठी उपयुक्त असल्याने त्यास ‘पेंट अॅनेमल’ म्हणतात़ त्यापासून शेतकऱ्यांना कुठलाच धोका नसतो़ उलट त्यापासून संतुलन ठेवता येते़ असा वैशिष्ट्यपूर्ण साप संवत्सर भागात कसा आला असेल, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु नंतर हा सर्प तेथून अदृष्य झाला़
(वार्ताहर)
सर्पमित्र पोपट दवणे (सोमैया डिस्टीलरी, वारी) यांनी तसेच पुणतांबा येथील सर्पमित्र सुनिल त्रिभुवन यांनी सापाचे छायाचित्र पाहिल्यावर सांगितले की, अत्यंत दुर्मीळ असलेला हा साप आहे़ कॉर्न स्नेकशी साम्य असणारा हा रंगीत, बिनविषारी साप आहे़ मात्र तो शेतकऱ्यांचाच मित्र आहे़ येथे तो प्रथमच पहावयास मिळाला़