मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:16 IST2017-10-06T18:06:46+5:302017-10-06T18:16:04+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सावेडी उपनगर शाखा, अहमदनगर आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे.

मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सावेडी उपनगर शाखा, अहमदनगर आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. तर नरेंद्र फिरोदिया स्वागताध्यक्षपद भुषविणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर यांनी दिली. संमेलन ४ आणि ५ नोव्हेंबरला अहमदनगर येथे होणार आहे. विभागीय साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी प्रा. जोशी म्हणाले, मसापच्या यंदाच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान सावेडी उपनगर शाखेला मिळाला आहे. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करताना परिषदेला आनंद होत आहे. पठारे यांनी आपल्या साहित्य कृतीतून मांडला असून प्रयोगशीलता जपणारे मराठी साहित्यातले वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकार म्हणून त्यांची वेगळी ओळख असल्याचेही जोशी यांनी सांगितले. यावेळी स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विभागीय सम्मेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, सह निमंत्रक राजन लाखे, वि. दा. पिंगळे, सदानंद भणगे, भालचंद्र बालटे यांच्या सह शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.