श्रीगोंद्यात रंगला सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:56+5:302021-08-21T04:24:56+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर सेवकांचा सन्मान आमदार डॉ. सुधीर ...

Rangala Retired Servants Honor Ceremony at Shrigonda | श्रीगोंद्यात रंगला सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान सोहळा

श्रीगोंद्यात रंगला सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान सोहळा

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर सेवकांचा सन्मान आमदार डॉ. सुधीर तांबे, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविक माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर यांनी केले. यावेळी दीपक भोसले, उद्धव गायकवाड, रमजान हवालदार, हरिश्चंद्र नलगे, एम. एस. लगड, आप्पासाहेब शिंदे, दीपक पाटील भोसले, राजेंद्र लांडे, एसी. बी. देशमुख यांची भाषणे झाली.

यावेळी सचिन लगड, नानासाहेब दळवी, सुनील दानवे, शिरीष टेकाडे, संजय वाळे, सुधीर काळे, स्मितल वाबळे, बाळासाहेब पाचपुते, बाजीराव कोरडे, वसंतराव दरेकर, देवराम दरेकर, बाळासाहेब भोर उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्धव गायकवाड व देविदास खेडकर यांनी केले. माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दिलीप काटे यांनी आभार मानले.

-----

२० श्रीगोंदा न्यूज

श्रीगोंदा येथे सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला.

Web Title: Rangala Retired Servants Honor Ceremony at Shrigonda