रस्त्यासाठी रणरागिणींनी दिला उपोषण करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 11:52 IST2020-08-27T11:50:18+5:302020-08-27T11:52:29+5:30

श्रीगोंदा -टाकळी कडेवळीत येथील वाळूज वस्ती -वऱ्हाडदेवी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरीही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यासाठी परिसरातील रणरागिणींनी  उपोषण करण्याचा इशारा दिला आहे 

Ranaraginis warned to go on a hunger strike for the road | रस्त्यासाठी रणरागिणींनी दिला उपोषण करण्याचा इशारा

रस्त्यासाठी रणरागिणींनी दिला उपोषण करण्याचा इशारा

श्रीगोंदा -टाकळी कडेवळीत येथील वाळूज वस्ती -वऱ्हाडदेवी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरीही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यासाठी परिसरातील रणरागिणींनी  उपोषण करण्याचा इशारा दिला आहे 

 परिसरातील महिलांनी  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन  दिले आहे. या निवेदनात सीताबाई भिसे, अलका भिसे, मालन आधोरे, अनिता आधोरे, ठकुबाई झिंजाडे, योगिता खेडकर, लतिका वाळुंज, श्रद्धा वाळुंज, रोहिणी गाडे,  संजना सुपेकर, प्रियांका इथापे, जयश्री वाळुंज, अश्विनी वाळुंज आदी महिलांच्या सह्या आहेत.

Web Title: Ranaraginis warned to go on a hunger strike for the road