शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:40 IST

पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील दंगलीत दलित समाजावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध करणा-या तरूणांवर पोलिसांनी कलम ३०७ व ३९५ अंतर्गत कारवाई करून पुन्हा अन्याय चालविला आहे. राज्यातील हजारो तरूण आजही जेलमध्ये आहेत. या बाबत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाने थेट भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.भीमा-कोरेगाव घटनेबाबत गायकवाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी नगरमध्ये होणा-या शासकीय कार्यक्रमांत प्रवेश करून या सरकारला काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. या आंदोलनात रिपाइंसह समविचारी संघटना व पक्ष सहभागी होणार आहेत.भीमा-कोरेगावची दंगल ही सरकार पुरस्कृत व पूर्वनियोजित होती. पोलिसांनी योग्य वेळी बंदोबस्त तैनात केला असता तर घटना टळली असती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली. आंदोलन करणा-या तरूण व कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्यांना अटक केली. सुशिक्षित तरूणांवर सरकार गुन्हेगारीचा शिक्का मारत आहे. कोरेगाव-भीमा येथील घटना ही दलित-मराठा वाद नाही. मात्र काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. या घटनेनंतर पक्षाने राज्यस्तरीय मोर्चा आयोजित करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. पक्षात राहून जर विचारांचा कडेलोट होत असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले. कोरेगाव-भीमा या घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्याकडे न ठेवता सुनील रामानंद अथवा कृष्णप्रकाश यांच्याकडे वर्ग करावा अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.

जिग्नेश मेवानी तरूण नेतृत्व

कुठल्याही चळवळीत विशिष्ट काळानंतर नवीन नेतृत्व उदयाला येत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवानी हा तरूण नेता लोकांमधून निवडून आलेला आहे. त्यामुळे येणा-या काळात मेवानी हे नेतृत्व म्हणून उदयाला येऊ शकतात, असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवले