नेवासा नगरपंचायतचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:04+5:302021-03-24T04:19:04+5:30
नेवासा शहरातील कचऱ्याच्या समस्या मांडण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे निरंजन डहाळे, नगरसेवक सचिन नागपुरे, भाजपचे सरचिटणीस ...

नेवासा नगरपंचायतचा कारभार रामभरोसे
नेवासा शहरातील कचऱ्याच्या समस्या मांडण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे निरंजन डहाळे, नगरसेवक सचिन नागपुरे, भाजपचे सरचिटणीस आप्पा गायकवाड, मनोज डहाळे, कोषाध्यक्ष संजय गवळी,चिटणीस महेश लबडे हे गेले असताना कार्यालयात अधिकारी आढळून आले नाही.
नुकत्याच झालेल्या पावसाने काही भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दलदल ही साचलेली आहे. ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी भाजपचे पदाधिकारी हे नगरपंचायतमध्ये गेले असता, त्यांना समस्या कोणाकडे मांडाव्यात, असा प्रश्न निर्माण झाला. अधिकारी बाहेर गेल्याचे त्यांनी दिसले संतप्त झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी खुर्चीला हार घालून आपल्या भावना व्यक्त केल्या.
पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी, इंजिनीअर, रोखपाल यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. असाच भोंगळ कारभार राहिला, तर नागरिकांच्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा सवाल करत नगरपंचायतच्या विरोधात तीव्र आंदोलन आता जनतेला बरोबर घेऊन छेडावे लागेल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, ओबीसी मोर्चाचे निरंजन डहाळे, नगरसेवक सचिन नागपुरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
(२३ नेवासा)