शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडच्या टॅँकरमुक्तीसाठी उजनी पाणी योजना-राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:50 IST

जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. 

जामखेड : जामखेडला टॅँकरमुक्त करण्यासाठी उजनी धरणातून ११७ कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. यामध्ये पुढील ५० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार केला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. जामखेड शहरातील गणेश हॉलमध्ये तालुक्यातील सेवा संस्थेचे अध्यक्ष, संचालक, सभासद शेतकरी, सचिव, सहसचिव यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, १९९९ साली कुकडीचे हक्काचे पाणी तालुक्याला देण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांनी एक टीएमसी पाण्याची तरतूद केली होती. परंतु सत्ता बदलानंतर आघाडी सरकारमधील पवारांनी ते देण्याचे टाळले. आज तेच येथे आम्ही पाणी आणणार, अशा घोषणा करीत आहेत. पुढील पाच वर्षांत कृष्णा-भीमा स्थिरीकरण खो-याचे पाणी तालुक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.सुधीर राळेभात म्हणाले, पालकमंत्री तुम्ही सर्व विकास कामे केली आहेत. आता फक्त तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आता तुमच्याबरोबर संपूर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक मंडळ व सचिव आहेत.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात पाटील, नगराध्यक्ष निखिल घायतडक, जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, ज्येष्ठ नेते पांडुरंग सोले, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रविण सानप, अ‍ॅड. बंकटराव बारवकर, ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अमोल राळेभात, माजी उपसभापती विलासराव मोरे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019