शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

चारा छावण्यांमध्ये बालकांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:48 IST

जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करणाºया इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर सर्रास लहान मुले वावरताना दिसत आहेत.

सत्तार शेखहळगाव : जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी करणाºया इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर सर्रास लहान मुले वावरताना दिसत आहेत. चारा छावणी चालकांसह पशुपालकांकडून लहान मुलांच्या सुरक्षेला धाब्यावर बसविले जात आहे. त्यामुळे छावण्यांवरील लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.परिसरातील हळगाव, पिंपरखेड, आघी, चोंडी, फक्राबाद, खांडवी, बावी, जवळा, कवडगाव, गिरवली आदी गावांमध्ये सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जनावरांसाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार हिरवा चारा व पशुखाद्य देण्यात अनेक छावण्यांमध्ये दुजाभाव केला जात असल्याचे चित्र आहे. छावणीचालकांच्या गोटातील मोजक्या पशुपालकांना नियमाप्रमाणे तर इतरांना कमी चारा दिला जात असल्याचे अनेक शेतकरी खासगीत सांगत आहेत. थेट तक्रार केल्यास संबंधित शेतकºयास छावणी चालकांकडून दमबाजी केली जात असल्याने होणारा अन्याय सहन करण्याची दुर्देवी वेळ पशुपालकांवर आली आहे.हळगाव परिसरातील एका छावणीत रणरणत्या उन्हात एक अल्पवयीन मुलगा उसाची वाहतूक करून हा ऊस चारा कुट्टी यंत्रात टाकताना दिसला. लहान मुलांचा छावणीतील कुट्टी यंत्रांवर कुट्टी करण्यासाठी वापर होत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले. विजेवरील या यंत्रांवर लहान मुलांचा वापर होत असल्याने या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हळगाव परिसरासह तालुक्यात सध्या उष्णतेची लाट कायम आहे. अंग भाजून काढणाºया जीवघेण्या वातावरणात लहान मुलांच्या सुरक्षेला खुलेआमपणे धाब्यावर बसविले जात आहे.छावणीतील जनावरांची निगा राखण्यासाठी काही पशुपालक आपल्या लहान मुलांना छावण्यांमध्ये पाठवित आहेत. अनेक छावण्यांमध्ये आकडे टाकून वीज घेतली जात असताना त्याभोवती ही मुले छावणीत मुक्तसंचार करीत आहेत. लहान मुले कडबा कुट्टीवर आपल्या जनावरांना मिळालेल्या चाºयाची कुट्टी करून घेण्यासाठी जातात.छावणीचालकही लहान मुलांना रोखत नाहीत. याशिवायपशुपालकही आपल्या लहान मुलांच्या जीवाची काळजी करताना दिसत नाहीत. यावरून छावण्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड