दारुबंदीसाठी राजुरीकर रस्त्यावर

By Admin | Updated: July 11, 2016 23:47 IST2016-07-11T23:43:22+5:302016-07-11T23:47:16+5:30

जामखेड : मागणी करुनही दारुबंदी होत नसल्याने संतप्त राजुरी (ता. जामखेड) येथील महिला, पुरूषांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.

Rajurikar on the road to alcohol | दारुबंदीसाठी राजुरीकर रस्त्यावर

दारुबंदीसाठी राजुरीकर रस्त्यावर

जामखेड : मागणी करुनही दारुबंदी होत नसल्याने संतप्त राजुरी (ता. जामखेड) येथील महिला, पुरूषांनी रस्त्यावर उतरुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सक्षम असलेल्या राजुरी गावात कायमस्वरूपी दारूबंदी व्हावी, यासाठी महिला व पुरुषांनी अनेकदा लढा दिला. तरीही दारुबंदी होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी जामखेड-खर्डा मार्गावरील राजुरी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात पुरुषांबरोबर महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यापुढे गावात दारुबंदी न झाल्यास निरनिराळ्या पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनात कॉ. राजाभाऊ देशमुख, बाप्पू धांडे, आश्रू काळदाते, युवा नेते मल्हारीराज सदाफुले, गणेश कोल्हे, नगरसेवक मोहन पवार तसेच ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते,गावकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. जामखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
ग्रामसभेत ठराव, उपोषण, आंदोलन करुनही राजुरी गावात दारुबंदी होत नसल्याने महिला, पुरुषांच्या भावना तीव्र होत्या.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rajurikar on the road to alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.