कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत राजू शेट्टी यांचा नगरमध्ये मोर्चा, महामार्गावरील चौकात ट्रफिक जॅम झाल्याने झाली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:46 IST2020-08-20T14:45:57+5:302020-08-20T14:46:04+5:30

अहमदनगर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चासाठी पोलिसांनी महामार्गावरील चौकात वाहतुकीस बंदी घातली होती. त्यामुळे चौकात ट्रॅफिक जाम झाली आणि एकाच ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाली.

Raju Shetty's march in violation of corona rules | कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत राजू शेट्टी यांचा नगरमध्ये मोर्चा, महामार्गावरील चौकात ट्रफिक जॅम झाल्याने झाली गर्दी

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत राजू शेट्टी यांचा नगरमध्ये मोर्चा, महामार्गावरील चौकात ट्रफिक जॅम झाल्याने झाली गर्दी

अहमदनगर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चासाठी पोलिसांनी महामार्गावरील चौकात वाहतुकीस बंदी घातली होती. त्यामुळे चौकात ट्रॅफिक जाम झाली आणि एकाच ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाली.

दूध दरवाढीच्या मागणीच्या आंदोलनासाठी आधी कोठला चौकात आंदोलक एकत्र जमले. तिथे मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न ठेवता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाताना मोर्चातही मोठी गर्दी पहायला मिळाली.  

तसेच या मोर्चामुळे महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे एकाच ठिकाणी चौकाचौकात वाहनांची गर्दी झाली. ही गर्दीही कोरोनाच्या प्रादुर्भावाला पोषक ठरली आहे. त्यामुळे आता या मोर्चावर पोलिस काय कारवाई करतात, तेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Raju Shetty's march in violation of corona rules